advertisement
Home muktainagar अस्मिता सायकलिंग स्पर्धेत जे.ई.स्कूलचे वर्चस्व.

अस्मिता सायकलिंग स्पर्धेत जे.ई.स्कूलचे वर्चस्व.

0
अस्मिता सायकलिंग स्पर्धेत जे.ई.स्कूलचे वर्चस्व.

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

भारत सरकारच्या खेलो इंडीयाच्या माध्यमातुन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया , सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्र्ट ,द सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव, मुक्ताईनगर तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त मुली साठी अस्मिता सायकलिंग स्पर्धेचे आयोजन मुक्ताईनगर तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धा १४ वर्षे, १७ वर्षे, व १९ वर्षावरील या तिन गटात पार पडल्या. यात मुक्ताईनगर जे.ई.स्कूलच्या खेळाडुंनी यश संपादन केले. १४ वर्षे गटात…द्वितीय क्रमांक….योगेश्वरी लक्ष्मण जयकर, तृतिय क्रमांक…..आर्या योगेश लांडे,, १७ वर्षे गटात….द्बीतिय…..ऐश्वर्या पांडुंरंग दिवाने,तृतिय क्रमांक….दिव्या रमेश नाफडे यांनी बाजी मारली. विजयी खेळाडुंना प्रमाणपञ, ट्राॅफी देवुन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील एकुण १६७ खेळाडुंनी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वितेसाठी मनोज चौधरी, सचिन भोळै, संजय ठाकुर यांनी सहकार्य केले.विजयी खेळाडुंचे संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहीणीताई खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डाॅ. सी.एस. चौधरी, संचालक पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील, प्राचार्य विकास चौधरी यांनी अभिनंदन केले.त्यांना क्रीडा शिक्षक संजीव वाढे, सुरेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version