advertisement
Home Malkapur अवकाळी पावसाने शेतात झोपलेली पिके शिवसेना (उबाठा) ने तहसीलदारांच्या दालनात आणून टाकण्याच्या...

अवकाळी पावसाने शेतात झोपलेली पिके शिवसेना (उबाठा) ने तहसीलदारांच्या दालनात आणून टाकण्याच्या धास्तीने भाडगणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाने केला सर्व्हे

0

अवकाळी पावसाने शेतात झोपलेली पिके शिवसेना (उबाठा) ने तहसीलदारांच्या दालनात आणून टाकण्याच्या धास्तीने भाडगणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाने केला सर्व्हेIMG 20260327 WA0001IMG 20260327 WA0000अवकाळी पावसाने शेतात झोपलेली पिके शिवसेना (उबाठा) ने तहसीलदारांच्या दालनात आणून टाकण्याच्या धास्तीने भाडगणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रशासनाने केला सर्व्हे

श्रीराम नवमी शासकीय सुट्टीच्या दिवशी ही तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,मंडळ अधिकारी शेतात

शेतातील झोपलेली पिके तहसीलदारांच्या दालनात टाकण्याचे आंदोलन स्थगित

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम भाडगणी येथे दि .19 मार्च 26 रोजी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जमीन दोस्त झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी 20 मार्च 26 रोजी तहसीलदारांना निवेदन दिले मात्र आठवडा उलटूनही तहसील प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले नाही या नुकसानीचा सर्वे करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे मागणी केली असता आमच्याकडे भाडगणी गावचा अतिरिक्त कारभार असून आम्ही हेच काम करायचे का असा उलट सवाल तलाठी यांनी शेतकऱ्यांना केल्याने दि.24 मार्च 26 रोजी संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन देऊन तीन दिवसात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीची सर्वे न केल्यास शेतातील झोपलेली पिके तहसील कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा गजानन ठोसर यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
शिवसेना( उबाठा)च्या अनोख्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने दि.24 मार्च 26 सोमवार दुपारी 4 वाजेपासून तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक,मंडळ अधिकारी आदिंनी भाडगणी शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे करण्यास सुरुवात केली. आज दि.26 गुरुवार रोजी श्रीराम नवमीची शासकीय सुट्टी असतांना देखील शेतकऱ्यांचा सर्वे सुरू असून भाडगणी शिवारातील व परीसरातील जवळपास 85 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे पुर्ण झाल्याने व राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचा सर्वे शुक्रवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना सांगितल्याने शुक्रवार दि.27 मार्च 26 रोजी चे वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झोपलेली पिके तहसीलदारांच्या दालनात आणून टाकण्याचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version