मलकापुर:-: तालुक्यातील ग्राम घिर्णी येथील ग्रामस्थांची घरगुती लाईट 14- 14 तास गुल होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांवर उन्हाळ्याच्या त्रीव झळा सोसण्याची वेळ आली आहे. याबाबत आज शिवसेना (उबाठा ) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी म.रा.वि.वि कंपनी अभियंता आर.जि. तायडे यांना निवेदन देऊन तीन दिवसात घिर्णी ग्रामस्थांची समस्या न सुटल्यास म.रा.वि.वि कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, घिर्णी येथील घिर्णी -उमाळी रोडवरील खंडोबा डि.पी, चोपडे डि.पी,भोपळे डि.पी वरील नियमित विज बिल भरणाऱ्या विज ग्राहकांची लाईट वाढीव लोडशेडींगच्या नावाखाली सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत 14-14 तासांचे लोड शेडिंग करण्यात येते.सद्य स्थितीत उन्हाळ्याच्या तीव्र झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत असून लहान मुले, घरकाम काम करणाऱ्या महिलां, घरातील अबाल वृद्धांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, तीन दिवसात पर्यायी व्यवस्था करून वाढीव लोड शेडिंग बंद न केल्यास सोमवार दि.23 मार्च 26 रोजी बिर्ला रोडवरील म.रा.वि.वि कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर निंबाजी सपकाळ, विष्णू गव्हाळे, गोपाल चव्हाण, गणेश सोनवणे, विनोद चोपडे, महादेव बोपले, जानराव सोनोने,वसंता गव्हाळे, प्रल्हाद चोपडे, दिनकर गव्हाळे, शंकर गव्हाळे, मंगलसिंह चव्हाण, कैलास पवार, गजानन ओंकार चव्हाण, समाधान गव्हाळे, प्रल्हाद भोपळे, विष्णू इंगळे, समाधान चोपडे, रामदास भोपळे,पांडुरंग भोपळे, गजानन चोपडे ,श्रीराम चोपडे ,वसंता चोपडे ,राजू महाजन, तुळशीराम चोपडे, गोपाल राऊत सह ग्रामस्थांच्या सह्या नमूद आहेत.
घिर्णी येथील ग्रामस्थांची घरगुती लाईन 14 -14 तास गुल होत असल्याने सोमवारी म.रा.वि.वि कार्यालयात शिवसेना (उ.बा.ठा) चे ठिय्या आंदोलन



