मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक, मलकापूर येथे अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन दिनांक 16 मार्च रोजी उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. जवळपास २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या समृद्ध प्रकल्प सादर केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभागाचे टेक्निकल एज्युकेशन चे संयुक्त संचालक डॉ. विजय मानकर उपस्थित होते. तसेच बुलढाणा आरटीओ कार्यालयातील अधिकारी प्रिया मगर या विशेष उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे होते. यावेळी संस्थेचे खजिनदार श्री. सुधीरभाऊ पाचपांडे, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. रमाकांत चौधरी, उपप्राचार्य प्रा. संदीप खाचणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख प्रा. योगेश सुशीर, प्रा. संतोष शेकोकार, प्रा. नितीन खर्चे, प्रा. सुदेश फरफट, डॉ. अमोघ मालोकार, प्रा. महेश शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पॉलिटेक्निकचे शैक्षणिक समन्वयक प्रा. मनोज वानखडे तसेच प्रा. साकेत पाटील, प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा. गजानन सुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर या शाखांतील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीच्या आधारे विविध प्रकल्प सादर केले. अनेक प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक उपाययोजना तसेच समाजोपयोगी संकल्पना मांडण्यात आल्या. स्पर्धेचे अभियांत्रिकी विभागाचे समन्वयक प्रा. अमोल हळदे तर पॉलिटेक्निक विभागाचे समन्वयक प्रा. संदीप मुंडाळे होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पाडले.
या स्पर्धेचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागानुसार प्रकल्पांचे मूल्यमापन करून विभागनिहाय विजेते निवडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय विजेत्या प्रकल्पांमधून ओव्हरऑल अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी विविध शाखांतील तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे बारकाईने परीक्षण करून त्यांचे मूल्यमापन केले. स्पर्धेत उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयाने दिलेल्या या व्यासपीठामुळे आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळाल्याचे सांगितले. विविध राज्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेबद्दल अत्यंत सकारात्मक अभिप्राय दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी नवथार व सानिया गिधवानी यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ख्याती चौधरी यांनी उपस्थित मान्यवर, परीक्षक व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. या राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री. अनिल इंगळे, श्री. पराग पाटील, डॉ. गौरव कोलते या सर्वांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पार पडले.



