advertisement
Home Khamgaon खामगांव न.प.ने वाढविला मालमत्ता कर रद्द करण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत...

खामगांव न.प.ने वाढविला मालमत्ता कर रद्द करण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
खामगांव न.प.ने वाढविला मालमत्ता कर रद्द करण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खामगांव न.प.ने वाढविला मालमत्ता कर रद्द करण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खामगाव :- खामगाव नगर परिषदेने आर्थिक वर्ष 25-26 मध्ये दुपटीने वाढलेला मालमत्ता कर हा शहरातील नागरिकांना वर झालेला अन्याय ठरतो. चालू आर्थिक वर्षातील दुपटीने करवाढ केल्याने खामगाव शहरातील सामान्य जनतेवर आर्थिक भुर्दड पडत आहे या कारवाईला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, जळगाव जामोद विधानसभा संघटक भिमराव पाटील, खामगाव तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार ,संग्रामपूर तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार, शेगाव तालुकाप्रमुख हर्षल आखरे,नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांडव, मलकापूर तालुका प्रमुख दीपक पाटील, मलकापूर शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, शिवसेना नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै. रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, उप तालुका प्रमुख संग्राम विजय मारोडे, किसान सेना उप तालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, विश्वनाथ पुरकर, सत्तार शाह, रफीकभाई पजायेवाले,माजी नगरसेवक पांडुरंग चिम, राधाकृष्ण गाढवे, कैलास नेमाडे, राहुल मेटांगे, प्रकाश पवार, भगवान पाटील, रामसिंग राजपूत, संजयसिंग राजपूत, विलास पवार, संतोष हरणे सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version