Top 5 This Week

Related Posts

अंबाबाई दर्शनासाठी भाविक पर्यटकांसह, सहली वाढल्या

राज्यातील महानगरपालिका निवडणूकीमुळे धार्मिक सहलींची पर्वणी सुरू झाली आहे. मतदारांना दर्शन घडवून आणलं जातंय. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबर महिना आणि ख्रिसमस सुट्टीत भाविक पर्यटकांची संख्या पंचवीस टक्के वाढली आहे. अंबाबाई दर्शनासाठी दररोज लाखों भाविक पर्यटकांचे जथ्थे दाखल होत आहेत देवस्थान समितीने भाविकांसाठी सर्व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण गर्दी अधिक होत असल्याने यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. विशेषतः महिला मतदारांसाठी आयोजित सहलींचे प्रमाण वाढले आहे. पुणे, धाराशिव, अहिल्या नगर, संभाजीनगर भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दररोज सरासरी पाऊण लाख ते दीडलाख भाविक दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात दाखल होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अधिक गर्दी होत आहे. गर्दीच्या काळात चोरीची  कोणतेही व अनुचित घटना घडली नाही. सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था नियोजन योग्य करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांतील भाविकांची संख्या अशी….. दिनांक  19.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 74839 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक  20.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 85729 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक  21.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 1,12,212इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक  22.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 85021 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक  23.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 74984इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक  24.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 1,35,629 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक  25.12.2025  रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 1,52,643 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles