HomeNashikपत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; व्हॉइस ऑफ मीडिया व जयहिंद लोक चळवळीचा...

पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; व्हॉइस ऑफ मीडिया व जयहिंद लोक चळवळीचा प्रेरणादायी उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी

व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरम, नाशिक जिल्हा आणि जयहिंद लोक चळवळ, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी नाशिक येथे पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी आमदार मा. डॉ. सुधीरजी तांबे यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्य पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य समन्वयक कुमार कडलक, राज्य संघटक गोरक्षनाथ मदने, विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंके, नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष कपिल भास्कर, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील, सुनील खैरनार, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंके यांनी तर दाभाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या सुमारे ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. डॉ. सुधीरजी तांबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थीदशेत असतानाच प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित केले पाहिजे. मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम करा. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. मेहनत, दूरदृष्टी, सकारात्मक विचार आणि चांगले संस्कार यांच्या बळावरच यश मिळते. समाजाला आदर्श व्यक्तिमत्त्वांची गरज आहे. आपण चांगला माणूस बनत शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. आज दिलेले हे शैक्षणिक साहित्य केवळ भेट नसून, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा आणि नवी ऊर्जा ठरो,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, पालक आणि पत्रकारांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. पत्रकारांच्या कुटुंबीयांप्रती सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments