भानगुरा गावातील 50ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी, ट्युबवेल वरील केबल वायरची अज्ञातांकडून चोरी;सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

दसरखेड एम.आय.डी.सी पो.स्टेत तक्रार; चोरट्यांच्या मुसक्या आवळून गस्त वाढविण्याची शिवसेना (उबाठा) ची मागणी
मलकापुर:- तालुक्यातील ग्राम भानगुरा येथील 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर अज्ञातांनी काल रात्री 18 एप्रिल रोजी वायरी कापून दीड लाख रुपयाच्या वायर्स लंपास केल्याची घटना घडली.
तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत असून चोरट्यांनी पोलिसांना न जुमानता चोरीचा सपाटा सुरूच ठेवला आहे.काल रात्री प्रशांत यशवंत बावस्कर, शांताराम ओमकार चव्हाण, दिनेश पांडुरंग बावस्कर, महेश कृष्णा बावस्कर, सुधाकर लक्ष्मण बावस्कर, बंडू प्रल्हाद वराडे, अतुल कृष्णा पाटील, दीपक शांताराम पाटील, वासुदेव ओंकार चव्हाण, रवींद्र रामधन टकले, कृष्णा शामराव बावस्कर, अनिल सुपडा पाटील, ज्ञानेश्वर एकनाथ पाटील, गणेश निना बोंडे, गजानन शंकर बोंडे, मुरलीधर नप्ते, ईश्वर पाटील, जयसिंग चव्हाण सह आदी 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून चोरून नेत शेतकऱ्यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास सह भानगुरा येथील शेतकऱ्यांनी याबाबतची एम.आय.डी.सी पोस्टेला तक्रार देऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.






