Top 5 This Week

Related Posts

मलकापूर शहरात पुरवठा अधिकाऱ्यांच्या 20 ते 22 ठिकाणच्या धाडीत सात हॉटेल धारकांकडून अवैध घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई

मलकापूर शहरात पुरवठा अधिकाऱ्यांच्या 20 ते 22 ठिकाणच्या धाडीत सात हॉटेल धारकांकडून अवैध घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई


मलकापुर:- घरगुती एलपीजी गॅस वापरा संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आदेश नियम आणि मार्गदर्शक तत्वे आहेत, सद्यस्थितीत जागतिक युद्ध परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये गर्व घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यानुसार घरगुती एलपीजी गॅसच्या सुविधासुरळीत करण्याकरीता तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर रोखण्याकरीता तालुकास्तरावर तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दहा कर्मचाऱ्यांची समिती गठित करण्यात आली असून आज दि.17 मार्च 26 रोजी त्या समितीच्या वतीने शहरातील 20 ते 22 हाॅटेलांवर धाडी टाकण्यात आल्या.सात ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर सुरू असल्याने पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे, नायब तहसीलदार नामदेव राठोड, मंडळ अधिकारी के.जी.राजपुत, तलाठी धीरज जाधव, तलाठी एम.सी.एदलाबादकर, महसूल सहाय्यक पुरवठा शाखा निशांत चव्हाण, महसूल सेवक निलेश म्हात्रे, महसुलसेवक निलेश तायडे, महसूल सेवक सतीश राठोड या दक्षता पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण सात हॉटेल वरील सात घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी दिली आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles