जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दोन मुले सुरक्षित. आज मंत्री खडसे यांची भेट घेत मानले आभार. दोन्ही मुलांची घेतली शिक्षणाची जबाबदारी.
मुक्ताईनगर प्रतिनिधी……
08 सप्टेंबर 2025… जळगाव जिल्ह्यातील गायरान (ता. यावल) येथील एका कुटुंबासाठी हा दिवस आयुष्यभर विसरता न येणारा ठरला.
त्या रात्री सुमारे 8.30 वाजता बालकृष्ण गुलाब बारेला (वय 32) हे आपल्या दोन लहान मुलांसह घरातून बाहेर पडले.
त्यांची लहान मुले –
रोहन (वय 8 वर्ष)
अंकित (वय 5 वर्ष)
यानंतर 12 सप्टेंबर रोजी रात्री 10.22 वाजता बालकृष्ण यांनी एका अज्ञात मोबाईल नंबरवरून आपल्या भाऊ मगन बारेला यांना फोन करून सांगितले की ते भरुच – दादर एक्सप्रेसने प्रवास करत होते.
दादर स्टेशनला गाडी पोहोचल्यानंतर त्यांना जाग आली…
पण त्यांच्या दोन्ही मुलांचा डब्यात कुठेही पत्ता लागत नव्हता.
कल्पना करा… एका वडिलांच्या डोळ्यांसमोर अचानक दोन्ही लहान मुले गायब झाली होती…
दोन दिवस त्यांनी स्वतः मुलांचा जीवापाड शोध घेतला. पण त्यानंतर त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटला.
16 सप्टेंबर रोजी कुटुंबीयांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान 20 सप्टेंबर रोजी वडाळा रेल्वे पोलिसांकडून एका जखमी व्यक्तीचा फोटो पाठवण्यात आला…
ओळख पटली – ते बालकृष्ण बारेला होते.
समजले की 17 सप्टेंबर रोजी रेल्वेतून पडून ते गंभीर जखमी झाले होते आणि उपचारासाठी त्यांना जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले होते.
पण नियतीला काही वेगळेच मान्य होते…
20 सप्टेंबर 2025 रोजी उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
एक वडील कायमचे निघून गेले… आई आधीच सोडून गेलेली…
आणि त्यांच्या दोन्ही छोट्या मुलांचा अजूनही काहीच पत्ता लागत नव्हता.
कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला होता…
ही घटना स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यापर्यंत पोहोचवली.
रक्षाताईं खडसे तात्काळ स्वतः लक्ष घालून मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना सूचना दिल्या आणि दररोज या प्रकरणाचा आढावा घेत शोधमोहीम सुरू ठेवली.
रक्षाताई यांच्या आदेशाने रेल्वे पोलीस आणि विविध यंत्रणांनी जळगाव, भरुच आणि दादर परिसरात शोधमोहीम सुरू केली.
दिवस गेले… आशा आणि काळजी दोन्ही वाढत होत्या…
आणि मग,
8 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजता ती आनंदाची बातमी आली — दोन्ही मुलांचा सुरक्षित शोध लागला
नवरात्रीच्या पवित्र दिवसांत आलेली ही बातमी त्या कुटुंबासाठी देवदूतासारखी ठरली.
आज 15 मार्च रविवारी मंत्री रक्षाताईं खडसे यांना प्रत्यक्ष भेटून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
ताईंनी दोन्ही मुलांची प्रेमाने विचारपूस करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर आलेला हा क्षण फक्त एका कुटुंबासाठीच नाही, तर माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जिवंत करणारा आहे.
मा.ना.रक्षाताई खडसे यांची संवेदनशीलता, तत्परता आणि माणुसकी या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली.
देव त्या दोन्ही मुलांना उज्ज्वल भविष्य देवो व दिवंगत बालकृष्ण बारेला यांना भावपूर्ण श्रद्धांजली





