शिवसेना (उबाठा) च्या 50% करमाफी साठी डफडे बजाव आंदोलनाच्या धास्तीने मलकापूर ग्रामीण ग्रा.प प्रशासक व ग्रामसेवक नरमले

Advertisement

दि. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेस मलकापूर ग्रामीण मधील ग्रामस्थांनी हजर राहण्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचे आवाहन

मलकापुर:- मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवकाकडून घरकरांमध्ये 50% सूट देण्याच्या शासन निर्णयाची अवहेलना होत असल्याने शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास सह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी नारखेडे यांना निवेदन देऊन सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत समोर डफडे बजाव आंदोलन करून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. शिवसेना (उबाठा)च्या आमरण उपोषणाच्या धास्तीने आज दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना जावक क्रमांक 1053 / 2025 नुसार लेखी पत्र देत दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मलकापुर ग्रामीण ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन कर माफी संदर्भातील आपला विषय हा ग्रामसभेमध्ये समाविष्ट करून विचार मांडण्यात येतील व ग्रामसभेचा निर्णय अंतिम मानला जाईल असे लेखी पत्र दिले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थकीत कराची रक्कम एक रकमी भरल्यास त्याला 50% टक्के रक्कम सुट देण्याचा शासन निर्णय दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामविकास व पंचायत राज विभाग क.श्री.पोतदार उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढला आहे‌. शासन निर्णय काढून तब्बल एक महिना उलटला असून त्याची संपण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 25 आहे. मात्र मलकापूर तालुक्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक या योजनेपासून ग्रामस्थांना वंचित ठेवत असून ग्रामस्थांना घरकरामध्ये 50% ची सूट दिली नाही योजनेला 25 दिवसांचा अल्प कालावधी शिल्लक असून आज दि.04 डिसेंबर 25 रोजी शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) सेनेचे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी पंचायत समिती नारखेडे यांना निवेदन देऊन मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील करदात्यांना तिन दिवसांत 50 टक्के सूट देऊन कर वसुली करण्यात यावी अन्यथा दि. 8 डिसेंबर 25 सोमवार रोजी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालय समोर डफडे बजाव आंदोलन करून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असल्याने आज दि. 8 डिसेंबर रोजी प्रशासक व ग्रामसेवक यांनी लेखी पत्र देत दि.10 डिसेंबर रोजी ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत 50 टक्के करांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तरी दिनांक 10 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामसभेस मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केले आहे.

Subscribe to Viral News Live