Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथील युनिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये युनिक बाल उत्सव उत्साहात संपन्न

IMG 20260301 WA0009
मुक्ताईनगर येथील युनिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये युनिक बाल उत्सव उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

मुक्ताईनगर शहरातील युनिक इंटरनॅशनल स्कूल मध्ये 28 फेब्रुवारी रोजी बाल उत्सव संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाट, नगरसेवक व शिवसेना जिल्हा उपप्रमुख छोटू भोई, एडवोकेट अरविंद गोसावी, नगरसेवक बबलू कोळी, माजी नगरसेवक निलेश शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे , माजी नगरसेवक पियुष मोरे, प्राध्यापक शरद भालेराव, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मासुळे, संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे छावा, हनुमान चालीसा, झुलता पाळणा, भारतीय संस्कृतीच्या दर्शनासह वेस्टर्न कल्चर प्रदर्शित करत इतिहास दाखवला तसेच शौर्यगाथा, बलिदान, त्याग या गोष्टींचे महत्त्व लहानपणापासूनच बिंबवण्यासाठी त्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांसह विद्यार्थी व पालकांनी भरभरून असा फीडबॅक देखील दिला. पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता. विशेष म्हणजे हा बालगट इयत्ता पहिलीत सुद्धा अजून दाखल नाही;तरी देखील एवढ्या कमी वयात इतका उत्कृष्ट परफॉर्मन्स त्यांना निश्चितच योग्य दिशेने घेऊन जाईल यात शंका नाही.
यावेळी
आमदार चंद्रकांत पाटील यांनी शाळेत चाललेल्या सर्व उपक्रमांचे तोंडभरून कौतुक करतांना शाळेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम मासुळे यांचे सह मुख्याध्यापिका मासुळे व त्यांच्या संपूर्ण टीम च्या अथक परिश्रमांचे कौतुक करत शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर तुषार वाघुडदे यांनी केले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles