Top 5 This Week

Related Posts

नियत वयोमानाने सेवानिवृत्त आठ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील आठ पोलीस अधिकारी व अंमलदार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे सायंकाळी 4 वाजता सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. डॉ. श्रेणीक लोढा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. बी. डी. पावरा तसेच प्रभारी पोलीस उप अधीक्षक (मुख्य), बुलढाणा उपस्थित होते.

यावेळी पोउपनि गजानन नामदेव मोरे, जीपीएसआय कैलास सोमनाथ जाधव, जीपीएसआय रविंद्र श्रीराम सोळंके, सफौ सुधीर वामनराव काळे, सफौ परमेश्वर जुलालसिंग राजपुत, सफौ राजू महादेवराव अनाळकर, सफौ गजानन भिकुजी हाताळकर व पोहेकॉ राजेंद्र सुदाम जाधव यांचा कुटुंबियांसह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोप व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

पोलीस कल्याण शाखा बुलढाणा तर्फे आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवाकाळातील कार्याचे कौतुक करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सुमारे 50 कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. समारोपानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles