Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर जुने गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी. —– नगरसेवक प्रशांत टोंगे यांची मागणी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी….
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकापासून जुने गावात जाणाऱ्या मेन रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने छोट मोठे अपघात होत असतात.

जुनेगाव येथे अंदाजे ८ ते १० हजार नागरिकांची वस्ती आहे. तसेच जे. ई.स्कूल व जिल्हा परिषदेची मराठी शाळा असून या परिसरात रविवारी आठवडे बाजार भरत असतो. त्यामुळे या रस्त्यावर पुरुष, महिला तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर टवाळखोर काही युवक मोटरसायकल अतिवेगाने चालवतात, त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक )बसविण्याची मागणी मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक प्रशांत ( गणेश) टोंगे यांनी मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे .

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles