Top 5 This Week

Related Posts

मालेगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड गावातील तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी.

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :….. तालुक्यातील सातोड गावातील एका कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. नाशिकहून होळीच्या देवदर्शनासाठी गावाकडे येत असताना 6 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालेगावजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये चार वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातोड गावचे पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाफडे कुटुंबीयांचे काही वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्य आहे. होळीच्या सणानिमित्त देवदर्शनासाठी ते नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोड चार चाकी वाहन क्रमांक एम एच 15 जे एम 51 82 ने येथे येत होते. याच दरम्यान मालेगाव परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात नाफडे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच सातोड गावचे पोलीस पाटील तसेच गावातील काही नागरिकांनी तात्काळ मालेगावकडे धाव घेतली. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सातोड गावाकडे आणण्यात येत असून जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे सातोड गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

.. मयतांची नावे …दीपक किशोर नाफडे..35 वर्ष,
प्रथमेश दीपक नाफडे…4 वर्ष,
अंकिता संजय नाफडे….19 वर्ष.
…. जखमींची नावे…
संजय पांडुरंग नाफडे…50 वर्ष,
चारुलता संजय नाफडे,
पूजा दीपक नाफडे..30 वर्ष.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles