advertisement
Home muktainagar जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल राजपूत यांची बिनविरोध निवड

जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल राजपूत यांची बिनविरोध निवड

0

जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल राजपूत यांची बिनविरोध निवड
……..शिरसाळा (ता. बोदवड) येथे पार पडला भव्य मेळावा; पदोन्नतीधारकांचा सत्कार

मुक्ताईनगर प्रतिनिधी…….

जळगाव जिल्हा महसूल सेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी शिरसाळा (ता. बोदवड) येथे बैठक व मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीस जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व महसूल सेवक उपस्थित होते.
संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष जितेश चौधरी यांची पदोन्नती झाल्याने त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी ही बैठक घेण्यात आली. सदर बैठक राज्याध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन मागविण्यात आले असता जळगाव जिल्ह्यातून एकमेव अर्ज विशाल राजपूत यांचा प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विशाल राजपूत यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून त्यामध्ये —
जिल्हा उपाध्यक्ष: अरुण पाटील
जिल्हा सचिव: देवेंद्र जाधव
फैजपूर विभागीय अध्यक्ष: महेंद्र चौधरी
भुसावळ विभागीय अध्यक्ष: रवींद्र धांडे
जळगाव विभागीय अध्यक्ष: विजय पाटील
एरंडोल विभागीय अध्यक्ष: जितेंद्र बडगुजर
पाचोरा विभागीय अध्यक्ष: ईश्वर पाटील
अमळनेर विभागीय अध्यक्ष: चंद्रकांत सरदार
जिल्हा कार्याध्यक्ष: नवल सानप
जिल्हा सरचिटणीस: ज्ञानेश्वर सुरडकर
जिल्हा खजिनदार: प्रशांत सरोदे
महिला जिल्हाध्यक्ष: वर्षाली पाटील
याच बैठकीत जळगाव जिल्ह्यातील सात महसूल सेवकांना शिपाई पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पदोन्नतीधारकांमध्ये डॉ. दिलीप साळवे, प्रवीण चिखलकर, जितेश चौधरी, एजाज पठाण, रमाकांत सपकाळे, सुनील खराटे व शरद पवार यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्यकर कमिटी अध्यक्ष डॉ. दिलीप साळवे, राज्य उपाध्यक्ष प्रवीण चिखलकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष पंडित इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जळगाव जिल्ह्यातील महसूल सेवक या मेळाव्यास उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version