कोलते कॉलेजमध्ये रंगणार भविष्यातील इंजिनीअर्सचा तांत्रिक कुरुक्षेत्र! नॅशनल लेव्हलचे ‘टेक तंत्र’चे वाजले बिगुल (कोडिंगपासून रोबो रेसपर्यंत तांत्रिक कौशल्यांची जुगलबंदी)

कोलते कॉलेजमध्ये रंगणार भविष्यातील इंजिनीअर्सचा तांत्रिक कुरुक्षेत्र! नॅशनल लेव्हलचे 'टेक तंत्र'चे वाजले बिगुल (कोडिंगपासून रोबो रेसपर्यंत तांत्रिक कौशल्यांची जुगलबंदी)
Advertisement

मलकापूर: येथील लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ संचलित पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये येत्या २० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘टेक तंत्र २के२६’ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक महोत्सवाचे आयोजन इंजीनिअरिंग व पॉलिटेक्निक मध्ये करण्यात आले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या ‘तांत्रिक कुरुक्षेत्रा’ची जय्यत तयारी सध्या सुरू असून, संपूर्ण परिसरात या महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. एआयसीटीई अंतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व एमएसबीटीई यांच्या मुख्य संरक्षणाखाली आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील, उपाध्यक्ष श्री. पी. डी. कोलते व सचिव डॉ. ए. डब्ल्यू. कोलते यांच्या मार्गदर्शनात हा थरार रंगणार आहे.

या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या तांत्रिक बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात संगणक विभागाची ‘कोडक्स’ ही कोडिंग स्पर्धा, मेकॅनिकल इंजिनीअरिंगची चित्तथरारक ‘रोबो रेस’ व ‘डिझाइन मास्टर’, इलेक्ट्रिकल विभागाचे गुंतागुंतीचे ‘सर्किट पझल’, सिव्हिल इंजिनीअरिंगचे ‘लाईट-वेट काँक्रीट क्यूब एक्सप्लोर’ आणि अप्लाइड सायन्स विभागाचे ‘पोस्टर प्रेझेंटेशन’ अशा चुरशीच्या स्पर्धांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. यातील पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी आपली कला सादर करू शकतो. विजेत्या स्पर्धकांसाठी लाखाहून अधिक रुपयांच्या पारितोषिकांसह उत्तेजनार्थ बक्षिसांची मोठी लूट ठेवण्यात आली आहे.

Advertisement

प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी आणि कार्यक्रम निमंत्रक प्रा. सदाशिव लवंगे व प्रा. दीपक जोशी यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. आयएसटीई व आयईआय नवी दिल्ली यांच्या सहकार्याने होणाऱ्या या राष्ट्रीय महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉलेज प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी https://forms.gle/SNxAA3HDD9sKFicu5 या लिंक ला भेट द्यावी किंवा थेट 9766118940, 9860007144, 9561357181 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here