ऑन डिमांड रेल्वे गाड्यांना रावेर सावदा, निंभोरा येथे थांबा द्यावा जळगाव पुणे मुंबईसाठी नवीन गाड्या सुरू करण्याची जोरदार मागणी

ऑन डिमांड रेल्वे गाड्यांना रावेर सावदा, निंभोरा येथे थांबा द्यावा जळगाव पुणे मुंबईसाठी नवीन गाड्या सुरू करण्याची जोरदार मागणी
ऑन डिमांड रेल्वे गाड्यांना रावेर सावदा, निंभोरा येथे थांबा द्यावा जळगाव पुणे मुंबईसाठी नवीन गाड्या सुरू करण्याची जोरदार मागणी
Advertisement

जळगाव | भुसावळ रेल्वे प्रशासनाने 15 तारखेला सुरू केलेली भुसावळ–प्रयागराज ऑन डिमांड विशेष रेल्वे गाडी ही प्रवाशांच्या दृष्टीने स्वागतार्ह पायरी आहे. मात्र, या गाडीला रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर, सावदा व निंभोरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नसल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात रेल्वे प्रवासी मित्र ग्रुपचे संयोजक व भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रशांत बोरकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे ठाम मागणी केली आहे की, ऑन डिमांड रेल्वे गाड्यांना वरील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत. थांबे नसल्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

यासोबतच खांडवा, इटारसी–जळगाव–मनमाड–पुणे–मुंबई या मार्गांवर नवीन विशेष रेल्वे गाड्या तसेच मेमो लोकल सेवा सुरू करण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मार्गांवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही पुरेशा रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.

या मागणीला संजय चौधरी, अशोक पाटील, सुरेश महाराज ठाकरे, सुभाष अकोले, वसंत महाजन, श्री भालेराव, श्री दामोदरे, इस्माईल खाटीक, शशांक बोरकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी व शेतकरी वर्गाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे सेवांचे वेळापत्रक सुधारून प्रवासी सुविधा वाढवाव्यात व रेल्वे उत्पन्नात वाढ करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने या न्याय्य मागणीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Subscribe to Viral News Live