मुक्ताईनगर येथे रामरोटी आश्रमाचा १ जानेवारी रोजी १९ वा वर्धापनदिन साजरा.

मुक्ताईनगर येथे रामरोटी आश्रमाचा १ जानेवारी रोजी १९ वा वर्धापनदिन साजरा.
मुक्ताईनगर येथे रामरोटी आश्रमाचा १ जानेवारी रोजी १९ वा वर्धापनदिन साजरा.
Advertisement
मुक्ताईनगर येथे रामरोटी आश्रमाचा १ जानेवारी रोजी १९ वा वर्धापनदिन साजरा.
मुक्ताईनगर येथे रामरोटी आश्रमाचा १ जानेवारी रोजी १९ वा वर्धापनदिन साजरा.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर शहरात अखंड 18 वर्षांपासून संत-महापुरुषांच्या विचार कार्यांवर चालू असलेली मानव सेवा हिच ईश्वर सेवा हि प. पु गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा या मानवतावादी सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रमाला स्वयंस्फूर्ती अन्नदात्यांचे , ज्ञात-अज्ञात दानशूर हितचिंतकांचे व पंचक्रोशीतील धार्मिक व सामाजीक सेवा कार्यातील निस्वार्थी संत सज्जन सेवकांच्या शुभाशीर्वाद व स्नेहरुपी सहकार्याने यशस्वीरित्या 18 वे वर्ष पुर्ण करुन 19 व्या वर्षात पदार्पण करत असुन त्या निमित्ताने दिं 1-1- 2026 गुरुवार रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

सकाळी 9 ते 12 गुरूदेव भजनी मंडळ चा भजनांचा कार्यक्रम झाला व दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादास सुरवात होवुन शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार चंद्रकांत पाटील, हभप उध्दव महाराज , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर टी जोगी , व जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व राम रोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे, सचिव रामभाऊ टोंगे व आश्रमाचे सर्व सदस्य संचालक, परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रामरोटी आश्रमाचे सेवकांनी परिश्रम घेतले.

Advertisement

*विशेष सहकार्य -……
1)वारकरी फडकरी व किर्तनकार महासंघ महाराष्ट्र राज्य
2)श्री साई प्रतिष्ठान हरताळा
3) संत मुक्ताई बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगर
4)जागृत हनुमान मंदिर हरताळा फाटा
5)जेष्ठ नागरिक संघ मुक्ताईनगर
6)मानवता सेवाधर्म आश्रम साळशिंगी
7)सनातन हिंदु धर्म जागरण मंच मुक्ताईनगर तालुका

*अखंड_18_वर्षांपासून आश्रमात वर्षभर सुरू असलेली संत सेवा कार्य……

1)आठवडे बाजारात येणार्‍या अंध दिव्यांग भिकारी, साधु – फकीर निराधार लोकांना दर रविवारला अन्नदान करणे.
2)दर महिन्याच्या एकादशीला संत मुक्ताई वारीला येणाऱ्या वारकऱ्यांना फराळ वाटप करणे.
3)दरवर्षी एक गाव आनंदाची दिवाळी या संकल्पनेवर त्या गावातील गोरगरीब आर्थिक दारिद्रय निराधार 101 कुटुंबांना दर दिवाळीला प्रत्येकी एक किलो तेल, तूप, साखर, रवा, मैदा, बेसन व मुलांना कपडे वाटप करणे.
4)दरवर्षी एक ते दोन अनाथ मुलांना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य पुरवणे.
5)दरवर्षी हिवाळ्यात बेसहारा भिकारी, मतिमंद मनोरुग्णांना थंडीचे ब्लँकेट वाटप करणे.
6)दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची भांडी वाटप करणे.
7)दरवर्षी संत गजानन महाराज प्रकट दिन व ऋषिपंचमीला एक क्विंटल मोतीचूर लाडू प्रसादाचे वाटप व रामरोटी आश्रम ते गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर येथे पालखी दिंडी काढणे.
8)दरवर्षी रामनवमी जन्मोत्सवानिमित्त मुक्ताईनगर शहरात भव्य-दिव्य प्रभु श्रीरामचंद्र यांचे शोभायात्रेचे आयोजन करणे.
9)रक्तदान व आरोग्य शिबिरे राबवून गोरगरिबांना मुंबईपर्यंत शासकीय योजनांद्वारे आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे.
10)दरवर्षी श्रावण मासात श्री क्षेत्र मुक्ताईनगर रामरोटी आश्रम ते धुपेश्वर पदयात्रेचे आयोजन करणे.
11)संत मुक्ताई यात्रा उत्सवात आलेल्या दिंड्यांचे आश्रमात मुक्काम व्यवस्था, वारकऱ्यांना 4 क्विंटल साबुदाणा खिचडी व महाशिवरात्रीला यात्रेत येणार्‍या भक्तांना 300 लिटर दुधाची वाटप करणे.
12)पाच दिवसीय यात्रेत वारकर्‍यांना पाणपोई व्दारे शुद्ध पाणी वाटप.
13)वर्षभरात आश्रमात येणार्‍या भ्रमंतीवरील साधु, महंत, महाराज यांचे मुक्काम व्यवस्था आदर तिथ्य करणे
14)दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी विविध रोपांची वाटप करणे.
15)दरवर्षी एक जानेवारीला आयोजित आश्रमाच्या वर्धापनदिनी वर्षभर राबविण्यात येणार्‍या सेवा कार्यांसाठी आवडीने गोडीने सढळ हाताने दान करणाऱ्या दानशूर दानदात्यांना सेवा सत्कार करणे.
16)वर्षभर संत महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम राम रामरोटी आश्रमात राबवून सामाजिक व धार्मिक सलोखा जपने.

Subscribe to Viral News Live