समाज माध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबादल्यात दहा लाख रुपये देण्याचे प्रलोभन , आमिष देणा-या गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्या कडून नकली नोटांचा मुद्देमाल हस्तगत

समाज माध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबादल्यात दहा लाख रुपये देण्याचे प्रलोभन , आमिष देणा-या गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्या कडून नकली नोटांचा मुद्देमाल हस्तगत
समाज माध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबादल्यात दहा लाख रुपये देण्याचे प्रलोभन , आमिष देणा-या गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्या कडून नकली नोटांचा मुद्देमाल हस्तगत
Advertisement

मुक्ताईनगर पोलीस ठाणे अंतर्गत कु-हा दुरक्षेत्रचे कार्यकक्षेतील मधापुरी, लालगोटा, हलखेडा, जॉधनखेडा, चारठाणा ता. मुक्ताईनगर अशा गावांत व परिरसरात वास्तव्यास असलेल्या काही गुन्हेगारवृत्तीच्या लोकांनी विविध समाजमाध्यमांवरुन एक लाख रुपयाचे मोबदल्यात १० लाख रुपये देण्याचे आर्थिक प्रलोभन , आमिष देणे, सोन्याचे नाणी , विटा देणे, काळी हळद देणे, रेड मर्क्युरी, उल्टी वासन, नागमणी देणे असे सामान्य लोकांना प्रलोभन देणारे व्हिडीओ प्रसारीत केले आहे. व सदर प्रलोभनाला बळी पडलेल्या देशातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांना नमुद भागात बोलावून त्यांना मारहाण करुन त्यांच्या कडील रोख रुपये व साहित्य लुटण्याचे प्रकार घडवून आणलेले आहेत. त्या बाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी सदर भागातील वरील प्रमाणे कृत्य करणा-या लोकांचे विरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

वरील प्रमाणे गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या कृत्याला आळा घालण्यासाठी प्रलोभन देणारे समाजमाध्यमावरुन प्रसारीत झालेले व्हिडीओ पाहुन सदर व्हिडीओ प्रसारीत करणा-या व व्हिडीओ मध्ये दिसणा-या इसमांचा शोध घेणे बाबत डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगांव यांनी आदेशित केले होते.

Advertisement

आज दिनांक २५/१२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेचे पूर्वी Saawariya Set या फेसबुक प्रोफाईलवरुन एक २८ सेकंदांचा व्हिडीओ (रिल्स) प्रसारीत केलेला दिसला. सदर व्हिडीओ मध्ये ” एक लाख का दस लाख मिलेंगा, जिसीको खरीदना है वही कॉल किजीए ” असे प्रलोभन देण्यात आले होते. सदर व्हिडीओ मध्ये संपर्क करण्यासाठी नमुद केलेल्या मोबाईल क्रमांकव्दारे व्हिडीओ प्रसारीत करणा-या इसमांपर्यंत पोहचलो असता (१) शिवकुमार शमी भोसले (२) देवकुमार शिवराज भोसले व महिला नामे (३) सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले तिन्ही रा. लालगोटा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव अशा आरोपींचा त्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन नमुद इसमांचे विरुध्द CCTNS NO. ४२०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६२, ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन आरोपी नामे देवकुमार शिवराज भोसले व महिला नामे सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले अशांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून

भारतीय बच्चो का बैंक पाँच सौ नंबर CHILDREN BANK OF INDIA असे लिहीलेल्या १०६५ कागदी नोटा तसेच पाच अॅन्ड्राईड मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगांव, अशोक नखाते अपर पोलीस अधिक्षक सुभाष ढवळे, उप विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर उप विभाग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे आशिष आडसूळ, पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर पोलीस ठाणे राजेंद्र चाटे सहा पोलीस निरीक्षक, . नयन पाटील पोलीस उप निरीक्षक यांनी व मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने केली आहे.

Subscribe to Viral News Live