मुक्ताईनगर येथील रामरोटी आश्रमात एकादशीला भाविकांची गर्दी.

मुक्ताईनगर … आज दि. १५ डिसेंबर २०२५, सोमवार, सफला एकादशीच्या पावन पर्वावर आदिशक्ती संत मुक्ताईंची मार्गशीर्ष वारी भक्तिभावाने पार पडली. ही वारी परंपरेने संत मुक्ताईंची सद्गुरू झेंडूजी महाराज पुण्यतिथी वारी म्हणून ओळखली जाते. कोथळी मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरातील गर्दी होती.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मंगेश महाराज वराडे (दाताळकर) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सुमारे ११२ वर्षांपूर्वी मल्लप्पा वासकर,विठोबा वासकर यांच्या अनुग्रहातून सुरू झालेली सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी व वारी परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. वासकर फड परंपरेनुसार संत मुक्ताई वारीची जबाबदारी सद्गुरू झेंडूजी महाराजांकडे आली आणि त्यांच्या माध्यमातून या वारीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. गावागावात व शहरांच्या कानाकोपऱ्यांत संत मुक्ताईंची दिंडी व वारी पोहोचवण्याचे कार्य सद्गुरू झेंडूजी महाराजांनी केल्यामुळेच या संत मुक्ताईंच्या मार्गशीर्ष वारीस “सद्गुरू झेंडूजी महाराजांची वारी” असे संबोधले जाते. त्याचबरोबर सद्गुरू झेंडूजी महाराजांची पुण्यतिथीही याच वारीत येत असल्याने या वारीला विशेष महत्त्व आहे.
सफला एकादशी व संत मुक्ताई सद्गुरू झेंडूजी महाराज पुण्यतिथी वारी निमित्त पहाटे संत मुक्ताईंचा अभिषेक व महापूजा संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील तसेच प्रमोद दिनकर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. सकाळपासूनच संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी आईसाहेब संत मुक्ताईंचे दर्शन घेतले.
या संत मुक्ताई सद्गुरू झेंडूजी महाराज पुण्यतिथी वारी निमित्त सद्गुरू झेंडूजी महाराज मठात ह.भ.प. भरत महाराज पाटील (बेळीकर) यांचे प्रभावी कीर्तन संपन्न झाले.
तसेच गंभीर शेनू चौधरी (विटवे), संतोष भिसे, गजानन कासार, गजानन वाघ (बोदवड) यांच्या वतीने वारीला आलेल्या हजारो भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
@ मुक्ताईनगर येथे राम रोटी आश्रमात फराळ वाटप…
संत मुक्ताईच्यापदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्रमुक्ताईनगर शहरात अखंड18 वर्षांपासून संत- महापुरुषांच्या विचार कार्यांवर चालू असलेली मानवसेवाहिचईश्वरसेवाहिसेवाभावीवृत्तीजोपासलेली पपु गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम येथे दर महिन्याच्या एकादशी वारीला सुरू असलेल्या फराळदान या कार्यक्रमात आज मुक्ताईनगर येथे आश्रमात फराळदाते
स्व पुष्पा गोपाळ महाजन (चौधरी मॅडम) याच्या स्मरणार्थ अतुल महाजन (फ्लोअर मिल) मुक्ताईनगर यांचेकडुन वारकर्यांना साबुदाणा फराळ वाटप करण्यात आले.
या कामी राम रोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे यांचे सह स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.






