प्रतिनिधी बुलडाणा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित

श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय किन्होळा
येथे बॅच १९९९-२००० चे गेट-टुगेदर संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, दलित मित्र समाज भूषण पंढरीनाथ पाटील साहेब, शाळेच्या स्थापनेमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सिताराम भाऊ पाटील, यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेश्वर सुसर यांनी केले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पर्यवेक्षक श्री टी एम सुसर हे होते,

प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाकर बाहेकर , माझी प्राचार्य श्री सुभाष ठेंग , ए एस टेकाळे , ए सी पवार हे होते,
सदर का,र्यक्रमांमध्ये विद्यालयाचे माजी प्राध्यापक श्री शिवाजी विद्यालय चांडोळ चे माजी प्राचार्य प्राध्यापक प्राचार्य सुभाष ठेंग यांनी विद्यालयाला पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बोर घेण्यासाठी २१००० रुपये जाहीर केले, शकील शेख , अल्पसंख्यांक मंत्रालय मुंबई यांनी पाच हजार रुपये दिले
दिनांक १४ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी बॅच १९८९ -१९९० मेळाव्यामध्ये विद्यालयाला बोर घेण्यासाठी ११००० हजार रुपये दिले
आजच्या बॅचने विद्यालयाला कमी पडणारे सर्व पैसे देण्याचे कबूल केले
येत्या एक महिन्यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल किन्होळा येथे बोर मोटर, फिटिंग सर्व व्यवस्था होईल
प्राचार्य श्री राजेश्वर सुसर यांनी सर्व माजी विद्यार्थी ,प्राध्यापक सुभाष ठेंग यांचे विद्यालय व संस्थेच्या वतीने आभार मानून ऋण व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांना सुभाष ठेंग , शेषराव दंदाले , प्राचार्य राजेश्वर सुसर यांनी संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन गणेश चव्हाण यांनी केले,
तर आभार प्रदर्शन शेख शकील यांनी केले,
आणि विद्यालयाप्रती आम्ही सदैव ऋणी आहोत अशा भावना व्यक्त केल्या ,राहुल बाहेकर ,एजाज पठाण , शहादत पठाण ,नागेश बाहेकर , अमोल बाहेकर, किशोर निकाजी , वसीम पठाण, विजय चौरे,
विष्णू वानखेडे,अंबादास बाहेकर, सलीम खा पठाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले






