विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी खडसे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्तुत्य निवड

Advertisement

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि धरणगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी धरणगाव येथे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अविष्कार स्पर्धेत श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयाचा १५ विद्यार्थी आणि दोन प्राध्यापकांचा संघ सहभागी झालेला होता. या सहभागी संघातील कल्याणी वळस्कर व आदित्य पाटील तसेच तुषार तेली व कल्याणी डापके यांची निवड विद्यापीठ स्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी झालेली आहे. त्याचबरोबर श्रुती ढवळे व श्रेया बुदुकले यांची निवड अन्वेषण या राष्ट्रीय पातळीवरील नवसंशोधनपर स्पर्धेसाठी झालेली आहे. सदर आविष्कार स्पर्धेसाठी संघनायक म्हणून प्रा. डॉ. बालाजी तोटावार यांनी कार्य केले.
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी.एस. चौधरी व समस्त संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे व डॉ. वंदना चौधरी तसेच अविष्कार समितीचे प्रमुख प्रा. पी. एस. प्रेमसागर , प्रा. डॉ. अनिल पाटील, प्रा. डॉ. रंजना झिंजोरे, प्रा. डॉ. संतोष थोरात आणि प्रा. डॉ. बालाजी तोटावार यांनी यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

Subscribe to Viral News Live