वाचनानेच यशोशिखर गाठणे शक्य — पो.नि. आशिष आडसूळ…… सुकळी विद्यालयात थाटात निरोप समारंभ संपन्न.

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी –आज वाचन संस्कृती नष्ट झाली. याचे कारण मुलांच्या हातात आलेला मोबाईल होय.आपला खरा मित्र पुस्तक असूनकेवळ वाचनानेच यशोशिखर गाठता येते असे प्रतिपादन मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांनी केले.
श्री. आडसुळ हे मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामदेव बाबा बहुउद्देशीय संस्था टाकळी चे सचिव डॉ. दिलीप पानपाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वागतगीत कु. विशाखा सोनवणे हिने गायले. त्यानंतर उपशिक्षक शरद बोदडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप दाणे यांनी केले. कार्यक्रमास ग.शि.अ.वसंत मोरे, केंद्र प्रमुख संजय ठोसर, अकोला येथील ललित टिटोरियलचे प्राध्यापक प्रशांत नरवडे आणि किशोर पाटील, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक विश्वभर अडकमोल , पोलीस पाटील संदीप इंगळे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी 10ची विद्यार्थिनी कु. निकिता खाडे हिने मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी पो.नि. आशिष आडसुळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द, परिश्रम, चिकाटी आणि वाचन यांच्या साहाय्याने यशोशिखर गाठले. म्हणून महापुरुषांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देतात.त्यासाठी पुस्तकांशी मैत्री करा, असा संदेश श्री.आडसुळ यांनी दिला.सूत्रसंचालन उपशिक्षक शरद चौधरी यांनी केले. तर आभार उपशिक्षक दत्तात्रय फेगडे यांनी मानले.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here