Top 5 This Week

Related Posts

योग्य नियोजनमुळे लाखो भाविकांनी घेतले श्री संत मुक्ताई व चांगदेव महाराजांचे दर्शन

IMG 20260215 WA0026मुक्ताईनगर प्रतिनिधी…. खानदेश चे आराध्य दैवत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई व योगीराज श्री चांगदेव महाराज यात्रा उत्सव निमित्त एकादशी व महाशिवरात्रि निमित्त लाखो भाविकांनी श्री संत मुक्ताई व श्री योगीराज चांगदेव महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे, कोथळी मंदिराचे व्यवस्थापक ह भ प उद्धव महाराज जुनारे , मेहुण मंदिराचे ह भ प रामराव महाराज यांनी सांगितले.

चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त महाशिवरात्रीला पहाटे पाच वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी माफदाचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ , जनता शिक्षण मंडळाचे संचालक अंकुश चौधरी, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील , तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ ,चांगदेव सरपंच निखिल बोदडे, तसेच जे के चौधरी, माजी सरपंच पंकज कोळी ,पोलीस पाटील पल्लवी भूषण चौधरी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी सर्व गुरव पुजारी परिवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली असे विष्णू गुरव पुजारी यांनी सांगितले.
विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा मुक्ताई चे दर्शन घेतले.
…. प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन..
आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई व योगराज श्री चांगदेव महाराज यात्रा उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी घेत असतात. यावर्षी आमदार चंद्रकांत पाटील यांनी यात्रेचे योग्य पद्धतीने नियोजन केलेले होते. यात्रा उत्सवाच्या आधी घेतलेल्या प्रशासनाच्या बैठकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी करण्यात आलेले असून कुठलीही गैरसोय दर्शनासाठी झालेली नसल्याचे भाविक व आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने यात्रा उत्सव कार्यक्रमांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवून होते असे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी सांगितले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles