मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृह परिसरात आढळला बिबट्या.
…. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही… आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर प्रतिनिधी…. 12 एप्रिल रविवारी सकाळी साडेआठ पावणे नऊ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरामध्ये शासकीय विश्राम गृह परिसरामध्ये वाघ आल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. परंतु प्रत्यक्ष तो वाघ नसून बिबट्या असल्याचे दिसून आले. सकाळी साडेआठ पूर्ण वाजे सुमारास आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी व काही कार्यकर्त्यांना रेस्ट हाऊसच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीला लागून बिबट्या दिसून आला.
तात्काळ आमदार चंद्रकांत पाटील यांनी विश्रामगृहावर धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. तात्काळ आमदार पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. घटनास्थळी व विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे सह पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.
@@ येत्या दोन घंटे मध्ये बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात येईल तसेच नागरिकांनी घाबरून न जाता शक्य असेल तरच घराच्या बाहेर पडावे लहान मुलांनी घराच्या बाहेर येऊ नये . वन विभागचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून खबरदारी म्हणून बस स्थानक तात्पुरते स्वरूपात बस आगार येथे हलविण्यात आलेले असून नागरिकांनी गर्दी करू नये तसेच घाबरू नये असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.




