मुक्ताईनगर शहर रविवारी बंद, बोदवड चौफुली ते बसस्थानकापर्यंत रस्ता बंद.  मतमोजणी साठी प्रशासनाची तयारी पूर्ण.

Advertisement

मुक्ताईनगर ….. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६४.४४ टक्के मतदान झाले आहे.
रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रथम टपाली 30 मतदानाची मतमोजणी प्रक्रिया होईल. एकूण सात टेबलवर मत मोजणीला सुरुवात होणार असून चार फेऱ्या होतील यासाठी 50 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वखारे यांनी सांगितले.

रविवारी वाहतूक मार्गात बदल….

Advertisement

२१ डिसेंबर रोजी मतमोजणी दिवशी मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुली ते बसस्थानकापर्यंत दोन्ही बाजूकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. ६ पोलीस अधिकारी व 150 पोलीस कर्मचारी चा ताफा मतमोजणी ठिकाणी असणार असल्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी सांगितले.
जोपर्यंत नगरपंचायतीचा निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत मुक्ताईनगर शहरातील दुकाने बंद ठेवण्याविषयीची नोटीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांनी दिलेली आहे.

Subscribe to Viral News Live