मुक्ताईनगर येथे 10 लाख 19 हजाराचा अवैध गुटखा जप्त.

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी…… मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये अवैध रित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी 4 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील खामखेडा पूलाजवळ पोलिसांनी पकडली आहे.

याबाबत किशोर हिम्मतराव बाविस्कर, वय 44 वर्षे, धंदा नोकरी, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन जळगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरबाज नौशाद बेग वय 30 वर्षे रा. काझी हाउस, खुल्ताबाद जि छत्रपती संभाजीनगर याचे विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Advertisement

……. मिळाला माल –

1) 57600 /- रुपये किंमतीचा रजनीगंधा सुगंधित पान मसाला एकुण 60 पाकिटे एका पाकीटाची किंमत 960/- रू

2) 99840/- रुपये किंमतीचा करमचंद प्रिमियम पान मसाला (12) बॉक्स एका बॉक्समध्ये 52 पाकिटे एकुण 624 पाकिटे) एका पाकीटाची किंमत 160/- रू

3) 84000/- रुपये किंमतीची मिराज तंबाखु (10 मोठे बॉक्स प्रत्येक मोठ्या बॉक्समध्ये 42 लहान बॉक्स) प्रत्येक लहान बॉक्सची

किंमत 200/-रू

4) 47000/- रुपये किमतीचा विमल पान मसाला (एक मोठी गोणी त्यात लहान पाच गोण्या प्रत्येक लहान गोणीत 20 पाकिटे एकुण 100 पाकिटे) प्रत्येक पाकिटाची किंमत 470/- रू

5) 43560/- रुपये किंमतीचा विमल पान मसाला (एक मोठी गोणी त्यात लहान दहा गोण्या प्रत्येक लहान गोणीत 22 पाकिटे एकुण 220 पाकिटे) प्रत्येक पाकिटाची किंमत 198/-रू

6) 43200/- रुपये किंमतीचा पानपराग पान मसाला एकुण 200 पाकिटे प्रत्येक पाकिटाची किंमत 216/- रू

7) 3000/- रुपये किंमतीची V1 BIG तंबाखु एकुण 100 पाकिटे प्रत्येक पाकिटाची किंमत 30/- रू

8) 4840/- रुपये किंमतीची V1 तंबाखु एकुण 220 पाकिटे प्रत्येक पाकिटाची किंमत 22/-रू

9) 12480/- रुपये किंमतीचा KC-1000 जाफराणी जर्दा एकुण 12 पिशव्या प्रत्येकी पिशवी मध्ये 52 पाकीटे, एकुण 1040 पाकिटे एका पाकीटाची किंमत 52 रुपये /-

10) 13500/- रुपये किंमतीचा तुलसी 00 रॉयल जाफराणी जर्दा एकुण 60 पाकीटे एका पाकीटाची किंमत 225 रुपये /-11) 6,00,000/- रुपये किमतीची पांढ-या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची अरटीगा कार क्र MH 46 Z 1065 जु.वा. M

12) 10,000/- रु. कि.चा एक VIVO कंपनीचा मोबाईल फोन त्यात एअरटेल कंपनीचे सिम क्र. 9665786320 असा क. असलेला त्याचा IMEI NO. 1) 863397076638770, 2) 863397076638762 असा
एकुण 10,19,020 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी अरबाज नौशाद बेग वय 30 वर्षे रा. काझी हाउस, खुल्ताबाद जि छत्रपती संभाजीनगर हा त्याच्या ताब्यातील पांढ-या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची अरटीगा कार के MH 46 Z 1065 मध्ये स्वतःच्या फायद्याकरीता जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातुन असुरक्षित, आरोग्यास घातक / अपायकारक व प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्रीसाठी, साठवणूक व वाहतूक करताना मिळुन आला व सन 2023 चे कलम 123, 223, 274, 275 अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006, मधील कलम 26 (2), 30 (अ), 26(2) (iv) सह वाचन अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दि. 16 जुलै 2025 चे आदेश, कलम 27 (3) (डी), 27 (3) (ई), 59 नुसार गुन्हा केलेला आहे. पुढील तपास पुढील निरीक्षक आशिष अडसूळ करीत आहे.

Subscribe to Viral News Live