Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे १९ मार्च रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

मुक्ताईनगर येथे १९ मार्च रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजनमुक्ताईनगर येथे १९ मार्च रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

मुक्ताईनगर येथे १९ मार्च रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन ……. विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांची विशेष उपस्थिती

मुक्ताईनगर प्रतिनिधी- ……… राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या निमिताने संपूर्ण भारतात मंडल व वस्ती निहाय हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून सकल हिंदूसमाजा तर्फे मुक्ताईनगर येथे गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी १०:३० ते १२:३० यावेळेत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मुक्ताईनगर मंडळात आयोजित सदर हिंदू मेळाव्याचे आयोजन गोदावरी मंगल कार्यालय भुसावळ रोड मुक्ताईनगर येथे करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रातीत मान्यवर उपस्थित राहणार असून मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक विश्व हिंदू परिषदचे अखिल भारतीय
संघटन महामंत्री मिलिंद परांडे, वेदांतचार्य १००८श्री श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती, वासुदेव सांदिपनी आश्रम निमगाव तसेच धर्माचार्य विश्व हिंदू परिषद तसेच श्रीसंत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.

गुढीपाडवा या हिंदू नववर्षरंभाच्या निमित्ताने सकाळी ९:३० वाजता नगरपंचायत जवळील श्रीहनुमान मंदिर येथून प्रवर्तन चौका मार्गे गोदावरी मंगल कार्यालया पर्यंत सकल हिंदू समाजातर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
समाजात एकात्मता, संस्कृतीचे जतन आणि सामाजिक बांधिलकी जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या संमेलनाच्या माध्यम मातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढविणे तसेच हिंदू संस्कृती आणि परंपरांबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचेही सांगण्यात आले. हिंदू मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या असून समिती सदस्यांकडून तसेच हिंदू समाज समिती नियोजनानुसार परिश्रम घेत आहे. मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles