मुक्ताईनगर प्रतिनिधी…. सालाबाद प्रमाणे 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई व योगीराज चांगदेव महाराज यांचा यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. यात्रोत्सवाची पूर्व तयारी नियोजनासाठी 2 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाचे सभागृहामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी मेहून चांगदेव मंदिराकडील रस्ता रुंदीकरण करणे तसेच रस्त्यात दुकाने लावली जाऊ नये. कोथळी मुक्ताईनगर मेहून तसेच चांगदेव येथील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील पथदिवे सुरू करावीत, नवीन मुक्ताई दिंडी मार्ग वर लाईटची व्यवस्था करावी, पिण्याचे पाण्याचे टँकर मोबाईल शौचालय तसेच योग्य ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी , घनकचऱ्या साठी ट्रॅक्टरचे ट्रॉली ठेवण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.
चांगदेव मंदिराजवळील घाटावर भाविकांची मोठ्या प्रमाणात आंघोळीसाठी गर्दी होते. तेथील पायऱ्यांवर दुकाने लावू नये अशा सूचना तहसीलदार गिरीश वखारे यांनी केल्या.
चारही मंदिराजवळ तात्पुरते पोलीस चौकी उभारावी ,जुने कोथळी मंदिराजवळील लहान पुलाजवळ पोलीस बंदोबस्त मिळावा तसेच चारही मंदिरावरील मंडपाचा खर्च शासनाने करावा अशी विनंती मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील यांनी केली.
बैठकीला प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार गिरीश वखारे, मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, बीडीओ सपकाळे, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी दीपक पुदाके, कोथळी चे सरपंच नारायण चौधरी, उद्धव महाराज, रामराव महाराज, ज्ञानेश्वर हरणे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता प्रवीण बेंडकुळे, नगरपंचायतीचे नगरसेवक ,सिविल सोसायटीचे सदस्य, पोलीस अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक ,भाविक, नागरिक उपस्थित होते
मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताई व चांगदेव महाराज यात्रा उत्सव निमित्त नियोजन बैठक




