Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे शिवजयंती जन्मोत्सव निमित्त बैठक संपन्न. —— शिवजयंती जन्मोत्सव अध्यक्षपदी नगरसेवक नितीन (बंटी) जैन.

मुक्ताईनगर प्रतिनिधी….. १९ फेब्रुवारी शिवजयंती जन्मोत्सव निमित्त येथील शासकिय विश्रामगृहावर ८ फेब्रुवारी रोजी नियोजन बैठक चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत पाटील होते. प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी सर्व धर्मीयांनी व सर्व विविध संघटनेतील सामाजिक संस्था शाळा कॉलेज , यांचेसह जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी यांनी सहभाग घेतला पाहिजे असे सांगीतले. बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव समिती अध्यक्ष पदी नगरसेवक नितीन उर्फ बंटी जैन यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी पुढील कार्यकारणी लवकरच केली जाईल असे सांगण्यात आले.
बैठकीमध्ये सकल मराठा समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख , साहित्यिक अ. फ. भालेराव , रामरोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे , यु डी पाटील सर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. टी. जोगी, पूर्णाड चे माजी सरपंच रामभाऊ पाटील , सामाजिक कार्यकर्ते
दिनेश कदम , शिवसेना तालुकाध्यक्ष नवनीत पाटील , माजी नगरसेवक निलेश शिरसाट, नगरसेवक संतोष उर्फ बबलू कोळी , नगरसेवक मस्तान कुरेशी ,नगरसेवक गणेश टोंगे, नगरसेवक वसीम शेख. नगरसेवक वाशिम खान , पत्रकार मोतीलाल जोगी , पत्रकार संदीप जोगी , अफसर खान, सुभाष बनिये, पीयूष मोरे, सोपान तायडे हरताळा ,समीर मेंबर हरताळा , भास्कर पाटील ,महेंद्र मोंढाळे, देवानंद वंजारी , राजेंद्र वंजारी, सोपान मराठे ,भैय्या श्रीखंडे , गणेश पाटील, विजय सावळे, वसीम खान उपस्थित होते.
शिवजयंती जन्मोत्सव बैठकी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सजावट पताके व स्टेज उभारणे, ढोल ताशे., घोडा बग्गी , मावळ्यांची सजावट यांविषयी चर्चा करण्यात आली.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles