advertisement
Home muktainagar मुक्ताईनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन.

मुक्ताईनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन.

0

मुक्ताईनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन.

मुक्ताईनगर प्रतिनिधी….. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथील प्रवर्तक चौकामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी तसेच मान्यवरांची गर्दी झाली होती.
सकाळी 11 वाजता समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. सेवानिवृत्त सैनिक अरुण वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य पर्यटन सचिव के. वाय. सुरवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे, राजू बोदडे, सुनील अढागळे गुरुजी, बापू ससाणे, उमेश झाल्टे, एस. के. गायकवाड सर ,रवी बोदडे, दिपक तायडे , संतोष इंगळे व समाज बांधव उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख ॲड. चेतन झनके यांनी महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले.
नंतर भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने शहरातून मोटरसायकल रॅली काढली होती. संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून प्रवर्तन चौकापर्यंत रॅली काढली होती. प्राचार्य डॉ. आय डी पाटील, सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांचे पुत्र हर्षराज पाटील तसेच उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाठ यांनी पुष्पगुच्छ घालून अभिवादन केले. यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख व नगरसेवक छोटू भोई ,आरपीआय तालुकाध्यक्ष सुधाकर बोदडे , शिवसेना अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख राजेंद्र वानखेडे, नगरसेवक संतोष कोळी, गणेश टोंगे ,निलेश वानखेडे ,निलेश शिरसाठ , स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर एसटी आगारातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. एसटी शहरातून प्रवर्तन चौका मार्गे मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत आगार प्रमुख निलेश कलाल ,वाहतूक नियंत्रक अनिल बावस्कर ,उत्सव समिती अध्यक्ष कैलास वंजारी, सचिव राजेश ठाकूर ,उपाध्यक्ष सुनीता भालेराव, संगीता पाटील कार्यकारणी चे सर्व सदस्य, आगारातील सर्व कर्मचारी यांचे चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ व कर्मचाऱ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर , शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version