advertisement
Home muktainagar मुक्ताईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुक्ताईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0

मुक्ताईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुक्ताईनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मुक्ताईनगर प्रतिनिधी :……. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे .ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रोहिणी खडसे खेवलकर होत्या. मुख्याध्यापक व्ही एम चौधरी व उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी संस्थेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांनी “संविधान वाचन ही काळाची गरज आहे” असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक संजय ठाकूर यांनी संविधान वाचन घेतले, तसेच सर्व शिक्षकांनी संविधान पत्रिकेचे वाचन केले. शाळेच्या सभागृहात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सकाळी एक तास सामूहिक वाचन घेण्यात आले..
कलाशिक्षिका अर्चना भोळे यांनी साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. उपस्थितांनी या कलाकृतीचे कौतुक केले.

यानंतर शाळेतून प्रवर्तन चौकापर्यंत घोषणा देत भव्य पायी रॅली काढण्यात आली. तेथे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कलाशिक्षक मनोज सुरवाडे तथा चि अक्षय सौंदळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वेश परिधान करून कार्यक्रमात रंगत भरली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाडे यांनी केले. तर आभार आर बी परदेशी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. के. पाटील, धीरज खडसे व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version