मुक्ताईनगर येथील रामरोटी आश्रमात महाशिवरात्रीनिमित्त 250 लीटर दुध वाटप

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी….संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगर शहरात वर्षभर अखंड 19 वर्षांपासुन संत महापुरुषांच्या विचार कार्यावरील चालू असलेली मानवसेवा हिच ईश्वर सेवा हि सेवाभावी वृत्ती जोपासलेली प_पु_गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रमाव्दारा सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने संत मुक्ताईच्या यात्रा उत्सवात आलेल्या भाविकांना 250 लीटर दुधाचे वाटप रामरोटी आश्रमात करण्यात आले. आजचे दानशुर दानदाते आश्रमाचे आधारस्तंभ ह्रदयरोग तज्ञ डॉ एन जी मराठे गायत्री हॉस्पिटल मुक्ताईनगर, प्रशांत बाळू महाजन कुंभारखेडा ह मु पुणे , सुनील सोपान महाजन रा अंतुर्ली ह मु भुसावळ, सुभाष पाटील रा गुलई मध्य प्रदेश यांचे कडुन रविवारी संत मुक्ताईच्या नगरीत महाशिवरात्रीला आलेल्या भाविक- भक्त वारकर्‍यांना दुधाचे व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. प्रसंगी राम रोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे व रामरोटी सेवक परिवार मुक्ताईनगर यांनी परिश्रम घेतले.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here