मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल केंद्रावर कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल.

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी……बारावीची परीक्षा सुरू असून 16 फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल व ज्युनिअर कॉलेज इमारतीच्या ( केंद्राच्या) मागील बाजूचे लोखंडी गेट तोडून शाळेच्या प्रांगणामध्ये दहा ते १५ जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला. तसेच शाळेच्या दहा लोखंडी खिडक्यांच्या जाळ्या तोडल्या. पेपर सुरू असताना शाळेच्या आवारामध्ये अनधिकृतपणे प्रवेश तसेच शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी जे ई स्कूल येथील बारावी परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक प्रकाश रामकृष्ण बावस्कर (मुख्याध्यापक मी फ तराळ विद्यालय अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर) यांचे फिर्यादीवरून अफसर खान राहणार मुक्ताईनगर व इतर दहा ते पंधरा जणाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण करीत आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here