Advertisement
मुक्ताईनगर प्रतिनिधी….
मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील तसेच मुक्ताईनगर येथील रहिवासी योगराज कन्स्ट्रक्शन चे संचालक विनोद नामदेव सोनवणे यांनी मंगळवारी जळगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजू मामा भोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर विनोद सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे.
Subscribe to Viral News Live





