Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर प्र.क्र.12 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पराभूत! नैतिक जबाबदारी स्वीकारून सुनील पाटील व संतोष मराठे या दोघे पदाधिकाऱ्यांनी दिले राजिनामे

मुक्ताईनगर शहरातील नगरपंचायत निवडणूक 2025 चा निकाल रविवारी 21 डिसेंबर रोजी लागला या निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना चंद्रकांत पाटील या 2581 मताधिक्याने विजयी झाल्या असून सोबतच शिवसेनेचे नगरसेवक पदाचे अधिकृत
प्रभाग नं 1,5,6,7,10,11,13,14,15,16 अशा एकूण 17 पैकी 10 उमेदवार विजयी झाले तर निवडून आलेल्या तिघे अपक्षांचा कल देखील शिवसेनेकडे असल्याने खडसेच्या नेतृत्वातील भाजपाला केवळ 4 जागावर समाधान मानावे लागले असून केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला मुक्ताईनगर करांनी सपशेल नाकारले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या संघर्ष काळापासून बालेकिल्ला राहिलेल्या प्रभाग क्र.12 मध्ये मात्र शिवसेनेच्या उमेदवार यशोदा माळी यांनापराभव स्वीकारावा लागल्याने,“गड आला पण सिंह गेला” अशी परिस्थिती निर्माण झाली असून या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रभागाचे नेतृत्व केलेले तत्कालीन ग्रा.पं.सदस्य तसेच विद्यमान शिवसेना जिल्हासंघटक सुनील पाटील आणि माजी नगरसेवक तथा विद्यमान शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे यांनी राजीनामे दिले आहेत. सदरील राजीनामे जिल्हा प्रमुख समाधान महाजन तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द करण्यात आले.
मुक्ताईनगर शहरातील नगरपंचायत निवडणूक आ.चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री खा.रक्षा खडसे यांनीं प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृ्वाखालील शिवसेनेच्या पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला असून रक्षा खडसे यांचा दारून पराभव झालेला असून सोबतच रक्षा खडसेच्या समर्थनार्थ उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे व प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनाही मतदारांनी पराभवाचा जोरदार झटका दिला आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles