मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : शिवसेनेचा दणदणीत विजय, भाजपाला मोठा धक्का

Advertisement

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवली असून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवार संजना चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या भावना ललित महाजन यांचा तब्बल 2 हजार 436 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

नगरपंचायत निवडणुकीत एकूण 15 हजार 636 मतदान झाले होते. यापैकी शिवसेनेच्या संजना पाटील यांना 8 हजार 900 प्रत्यक्ष व 22 टपाली अशी एकूण 8 हजार 922 मते मिळाली. तर भाजपाच्या भावना महाजन यांना 6 हजार 480 प्रत्यक्ष व 6 टपाली अशी एकूण 6 हजार 486 मते मिळाली. NOTA ला 256 मते पडली.

Advertisement

 

प्रभागनिहाय निकाल

प्रभाग 1: प्रशांत (गणेश) अशोक टोंगे (शिवसेना) – 399 (विजयी)

प्रभाग 2: नईम बिस्मिल्लाह बागवान (भाजपा) – 411 (विजयी)

प्रभाग 3: नुसरतबी महेबूब खान (अपक्ष) – 376 (विजयी)

प्रभाग 4: खान हाशमशाह कासमशाह (अपक्ष) – 391 (विजयी)

प्रभाग 5: खान नशिबाबी शाहबाज (शिवसेना) – 232 (विजयी)

प्रभाग 6: प्रिती राजरत्न वानखेडे (शिवसेना) – 493 (विजयी)

प्रभाग 7: अंजनाबाई सुपडू सोनवणे (शिवसेना) – 344 (विजयी)

प्रभाग 8: साधना हरिश्चंद्र ससाणे (भाजपा) – 427 (विजयी)

प्रभाग 9: सलमाबी शेख मुशिर माणियार (अपक्ष) – 427 (विजयी)

प्रभाग 10: शेख ताहेराबी लुकमान (शिवसेना) – 254 (विजयी)

प्रभाग 11: शेख मस्तान शेख इमाम (शिवसेना) – 356 (विजयी)

प्रभाग 12: माधुरी सचिन पाटील (भाजपा) – 501 (विजयी)

प्रभाग 13: संतोष प्रल्हाद कोळी (शिवसेना) – 740 (विजयी)

प्रभाग 14: भारंबे प्रमोद हरी (शिवसेना) – 485 (विजयी)

प्रभाग 15: भलभले सविता सुभाष (शिवसेना) – 640 (विजयी)

प्रभाग 16: शिरसाट देवयानी निलेश (शिवसेना) – 445 (विजयी)

प्रभाग 17: चिंचोले अनुसयाबाई सुपडा (भाजपा) – 477 (विजयी)

 

 

राजकीय प्रतिक्रिया

या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार चंद्रकांत पाटील (शिवसेना – शिंदे गट) यांनी सांगितले की,
“नगरपंचायतीत प्रशासक असतानाही विकासाची दिशा ठरवली गेली. आजचा हा विजय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचा परिणाम आहे. 35 वर्षांनंतर मुक्ताईनगरच्या विकासाची संधी जनतेने आम्हाला दिली आहे.”

ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या सर्वांगीण विकासाला गती दिली जाईल.

दरम्यान, भाजपच्या उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पराभव स्वीकारत म्हटले की,
“या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माझी होती. निकाल मला मान्य आहे. ही निवडणूक आम्ही आमदारांच्या गुंडगिरी व दडपशाहीविरोधात लढवली होती.”

निष्कर्ष

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असून आगामी काळात शहराच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Subscribe to Viral News Live