Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर नगरपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न; उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा देवयानी निलेश शिरसाट यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

​सकाळी ठीक ८:१५ वाजता नगरपंचायत प्रांगणात आयोजित या सोहळ्यात राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. लोकशाहीचा उत्सव साजरा करताना उपनगराध्यक्षांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

​या सोहळ्याला नगरपंचायतीचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
​उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट,
सर्व सन्माननीय नगरसेवक व पदाधिकारी
​, मुख्याधिकारी, सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
​ध्वजारोहणानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी व शहरवासीयांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles