Monday, January 19, 2026
Home muktainagar मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड ; विशेष सभेत सभापतींची निवड

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड ; विशेष सभेत सभापतींची निवड

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड ; विशेष सभेत सभापतींची निवड
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड ; विशेष सभेत सभापतींची निवड
Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-……..महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा विषय समितीच्या निवडणूक नियम १९६६ मधील नियम ३ नुसार मुक्ताईनगर नगरपंचायतीची विशेष सभा आज सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी नगरपंचायत सभागृहात पार पडली. या सभेत नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध लोकनियुक्त नगराध्यक्ष संजना चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी ताहेराबी लुकमान शेख, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष देवयानी निलेश शिरसाठ, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सविता सुभाष भलभले यांची निवड झाली.
तसेच स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रिती राजरत्न वानखेडे, तर शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी हाशम शाह कासम शाह यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेदरम्यान पीठासन अधिकारी म्हणून मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित सर्व समित्यांचे सभापती व सदस्य यांचे आमदार चंद्रकांत पाटील, त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, स्वीकृत नगरसेवक छोटू भोई व स्वीकृत नगरसेवक नितीन जैन, अल्पसंख्यांक आघाडी कार्याध्यक्ष अफसर खान, पियुष मोरे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here