मुक्ताईनगरात डबल ढोलकी भूमिकेतील कार्यकर्त्यांना मतदारांनी नाकारले. मुक्ताईनगर नगरपंचायतीवर आमदार चंद्रकांत पाटील यांचे वर्चस्व… खडसेंना धक्का.
मुक्ताईनगर प्रतिनिधी…. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीवर आमदार चंद्रकांत पाटील (शिवसेना शिंदे गट )यांनी भगवा झेंडा फडकवला आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक आमदार चंद्रकांत पाटील व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती. नगराध्यक्ष पदासाठी (शिवसेना शिंदे गट) व भाजप उमेदवार यांच्यामध्ये सरळ लढत होती.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या भावना ललित महाजन यांचा पराभव केला.
तर नगरपंचायतीच्या 17 प्रभागापैकी दहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गट , चार प्रभागांमध्ये भाजप तर तीन प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत.
आमदार खडसे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा एकही उमेदवार येथे पक्षाची ताकद नसल्याचे सांगत निवडणुकीमध्ये उतरवला नव्हता. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक याची जबाबदारी घेतलेली होती. खासदार खडसे ह्या मुक्ताईनगर तळ ठोकून होत्या. खासदारकीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खासदार खडसे या मतदारांसमोर गेल्या होत्या. तर आमदार एकनाथराव खडसे यांच्या डबल ढोलकी च्या भूमिकेत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मतदार राजांनी या निवडणुकीमध्ये नाकारलेले असल्याचे दिसून येते. निवडणुकीचा प्रचार हा हाय प्रोफाइल प्रचार झालेला होता यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ,मंत्री ,केंद्रीय राज्यमंत्री, पालकमंत्री ,आमदार यांनी सहभाग घेतला होता. निवडणुक खडसे व पाटील परिवारा मध्ये असल्याचे बोलले जात होते. मतदानाच्या दिवशी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत शिवसेना भाजपामध्ये राडा देखील झाला होता.
इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे, जलवा किसी का भी हो जुलूस हम ही निकालेंगे ” हे मुक्ताईनगरातील प्रचार सभा वेळी चे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे वक्तव्य खरे ठरलेत.






