मुक्ताईनगरात जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा पत्रकार हे समाजाचे डोळे व कान – प्राचार्य व्ही. एम. चौधरी

मुक्ताईनगरात जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा पत्रकार हे समाजाचे डोळे व कान – प्राचार्य व्ही. एम. चौधरी
मुक्ताईनगरात जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा पत्रकार हे समाजाचे डोळे व कान – प्राचार्य व्ही. एम. चौधरी
Advertisement

मुक्ताईनगर,  :
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक पत्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पत्रकारितेच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकताना सांगितले की, “पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत. त्यांच्या निर्भीड लेखनामुळे अन्यायाला वाचा फुटते, तर समाजातील विकासप्रक्रियेला योग्य दिशा मिळते. मुक्ताईनगरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत पत्रकारांचे कार्य मोलाचे आहे.”

Advertisement

यावेळी उपस्थित पत्रकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. ग्रामीण भागातील समस्या, शिक्षण, शेती, आरोग्य तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर आधारित छोटेखानी सादरीकरण सादर करून आद्य पत्रकारास अभिवादन केले.

कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या लोकहिताच्या लढ्याला शाळा नेहमीच पाठबळ देईल, अशी ग्वाही देत प्राचार्य चौधरी यांनी पत्रकारांच्या कार्याला मनापासून सलाम केला.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Subscribe to Viral News Live