मुक्ताईनगरातील जि.प. उर्दू मुलांची शाळा क्र. २ मध्ये ‘Mentoring by Eminent Expert & Expert Talk’ उपक्रम उत्साहात संपन्न

Advertisement

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):
मुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. २ येथे Mentoring by Eminent Expert & Expert Talk या विशेष मार्गदर्शनपर उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते अहेसान सय्यद व नसीब खान यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, वैचारिक व व्यक्तिमत्त्व विकास कसा घडवावा, आधुनिक शिक्षणपद्धतीचे महत्त्व, पालकांची जबाबदारी आणि भविष्यातील विविध करिअर संधी या विषयांवर सखोल विवेचन करण्यात आले. वक्त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पालकांनीही कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

Advertisement

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुक्ताईनगर तालुक्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक आदरणीय कोंगे साहेब यांनी भूषविले. कार्यक्रमास शरीफ सर, जावेद सर, गुलनाज मॅडम, अश्फाक सर, हसन सर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून हकीम चौधरी, नगरसेवक मुशीर मन्यार, माजीद बागवान, नगरसेवक नईम बागवान, सामाजिक कार्यकर्ते शरीफ बेपारी, नाजिम सर यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज शेख व सदस्य अकील शेख, आजम शेख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. जि.प. उर्दू मुलांची शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक रिझवान सर, महेफुजा मॅडम, इरफान सर, शरीफ सर व मुसा सर यांनी परिश्रमपूर्वक नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा व सकारात्मक प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here