मुक्ताईनगरचे प्रा. ललित कांडवेलकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्रदान

Advertisement

मुक्ताईनगर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी शैक्षणिक कामगिरी प्रा. ललित काशिनाथ कांडवेलकर यांनी साध्य केली असून, त्यांना मुंबई विद्यापीठामार्फत पीएचडी (डॉक्टरेट) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेले प्रा. ललित कांडवेलकर हे श्री. काशिनाथ कांडवेलकर गुरुजी व सौ. पुष्पा कांडवेलकर यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते चिपळूण येथील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ह्याच शैक्षणिक ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत.

Advertisement

कोकण विभागात वारंवार येणाऱ्या पूर, भूकंप व इतर नैसर्गिक आपत्तींचा हॉटेल उद्योगावर होणारा परिणाम लक्षात घेऊन,
“A Study of the Effects and Challenges of Disasters on Hotel Industry and its Stake holders”
या विषयावर त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केला.

कोकणातील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये पीएचडी प्राप्त करणारे प्रा. कांडवेलकर हे पहिले प्राध्यापक ठरले असून, त्यांच्या या यशाचा फायदा महाविद्यालय व विद्यार्थ्यांना व पर्यटन व्यवसायिकांना होणार आहे. त्यांच्या या यशामुळे मुक्ताईनगरमधील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

प्रा. ललित कांडवेलकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुक्ताईनगर शहरातून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Subscribe to Viral News Live