Top 5 This Week

Related Posts

मलकापुर बसस्थानकावर सुविधांचा अभाव; शिवसेना (उबाठा) चे आगार व्यवस्थापकांना निवेदन

मलकापुर:- मलकापुर शहरातील बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी, सि.सि.टि व्ही कॅमेरे, चौकशी कक्षावरील दुरध्वनी सतत ना दुरुस्त असून बऱ्याच सुविधांचा अभाव असल्यामुळे आज शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक मुकूंद न्हावकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, सद्य स्थितीत उन्हाळा त्रीव जाणवत असल्याने बसस्थानकावर प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तसेच बसस्थानकाचे नुतनीकरण सुरू असून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बसस्थानकावर सि.सि‌.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याने चोरट्यांनी हैदोस घातला असून अनेक महिला प्रवाश्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याच्या पोथा चोरी गेल्याची घटना घडल्या आहेत गत सप्ताहात सकाळी सात वाजे दरम्यान पुणे येथे दवाखान्याच्या कामानिमित्त जाणाऱ्या मलकापुर येथील प्रवाश्याच्या खिशातून पन्नास हजार रुपये खिसे कापूंनी लंपास केले आहे.बसस्थानक चौकशी कक्षावरील बि.एस. एन.एल दुरध्वनी(बाप से भी नहीं लगेगा) हा नेहमीच बंद असल्याने व टेलीफोन ऑफीसमधील रींग ऐकू येत आल्याने प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने त्या ठिकाणी पर्याय म्हणून मोबाईल किंवा दुसऱ्या कंपनीचा फोन चौकशी कक्षात ठेवण्यात यावा अश्या अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी निवेदन देतांना आगार व्यवस्थापक मुकूंद न्हावकर यांचेशी चर्चा केली प्रवाश्यांच्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्या अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, उपतालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव,न.प माजी उपाध्यक्ष महादेवराव वनारे, विश्वनाथ पुरकर,हसन गौरी, ज्ञानदेव पाटील,वासुदेव मोकासरे, रमेश विटेवार सह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles