पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

Advertisement
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन 2

मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात 5 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, मेडिकल सेल, जीवनज्योती ब्लड बँक आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील एकूण 37 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन मा. डॉ. जयश्री खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे आरोग्यविषयक फायदे तसेच समाजातील त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement

डॉ. युगेश खर्चे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही तेवढेच महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी एच डी फ सी बँकेचे सचिन मनसुटे, रुपेश राठी, भूषण वाघ आणि अमोल सुरळकर, तनुजा नाफडे, सायली पाटील उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सचिन बोरले, प्रा. आचल गोळे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी), प्रा. ख्याती चौधरी आणि प्रा. चैताली नारखेडे (मेडिकल सेल अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले

Subscribe to Viral News Live