Top 5 This Week

Related Posts

जे ई स्कूल व ज्यु. कॉ. मुक्ताईनगर मध्ये सांस्कृतिक महोत्सवात कलाकारांनी केली धमाल.

मुक्ताईनगर प्रतिनिधी….. IMG 20260128 WA004626 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर येथे वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि 21 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजित या महोत्सवात विविध उपक्रमामध्ये मुला मुलींनी मोठया संख्येत सहभाग नोंदवून धमाल केली.
उपशिक्षक एस आर ठाकूर यांनी संविधान प्रास्ताविकासह, असाक्षरता, तंबाखूमुक्त शाळा याविषयी शपथ उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.एकनाथराव खडसे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, बालभारती पाठ्य पुस्तक मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील भुसावळ,संस्थेच्या चेअरमन ॲड रोहिणी खडसे , उपाध्यक्ष नारायण चौधरी,सचिव डॉ सी एस चौधरी,संचालक पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील, रमेश खाचणे, प्राचार्य विकास चौधरी, सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षा योगिता पाटील यांचेसह मुख्याध्यापक आर वाय सोनवणे, मुख्याध्यापिका चित्रा भारंबे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय एस. आर. ठाकूर यांनी केला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास चौधरी यांनी केले.स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा घेत असलेले विविध उपक्रम ,विविध स्पर्धा परीक्षा याविषयी माहिती दिली. त्यानंतर कु देवश्री विकास पाटील हिने ईस्ट अँड वेस्ट, जे ई स्कूल इज द बेस्ट याविषयी खास प्रभावी वक्तृत्व शैलीत व्यक्त केलेले मनोगत उपस्थितांचे मन जिंकून गेले.
प्रसंगी इ. १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी,राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी , एनसीसी बेस्टकॅडेट,आदर्श विद्यार्थी तसेच वेग वेगळ्या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावेळी शाळेचे ” झेप ” हस्तलिखिताचे प्रकाशन ऍड रोहिणी खडसे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शाळेच्या उपक्रमात विशेष योगदान दिल्याबद्दल उपशिक्षक शिवाजी वंजारी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर डॉ जगदीश पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले, प्रसंगी श्रवण, वाचन, लेखन सारख्या 9 गोष्टींकडे आपले लक्ष केंद्रित करून आपला सर्वांगीण विकास साधावा,त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. या बाबत मार्गदर्शन केले.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य.व्ही.एम.चौधरी यांचे मार्गदर्शनाखली उपप्राचार्या व्ही.के.शिर्के,पर्यवेक्षक व्ही.डी.ब-हाटे,के.आर.कवळे,एस पी राठोड, सांस्कृतिक मंडळ प्रमुख वाय.एस.पाटील,उपप्रमुख बी.एम.कोल्हे सचिव व्ही.एस.राणे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.व्ही.महाजन व आर.डी.भोळे यांनी केले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

Popular Articles