Top 5 This Week

Related Posts

जिल्ह्यात जुगार व अवैध दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 17 आरोपींवर गुन्हे दाखल

बुलढाणा जिल्ह्यात जुगार व अवैध दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने 10 मार्च 2026 रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई करत 17 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईदरम्यान नगदी रक्कम, जुगार साहित्य तसेच देशी दारू असा एकूण 25,625 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

जिल्ह्यात वरली मटका, तासपत्ता जुगार तसेच इतर अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी कारवाई करण्याचे नियोजन केले.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोद येथे तासपत्ता जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाई केली. या ठिकाणी सागर शंकर गिरी (वय 32, रा. एकलारा) याच्यासह इतर पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून 11,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील काळेगाव शिवारात तासपत्ता खेळणाऱ्या भगवानसिंग रामसिंग सोळंके (रा. काळेगाव) याच्यासह इतर दोघांना पकडून 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याशिवाय अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंत्री खेडेकर येथे प्रभाकर बळीराम मोरे (वय 55) याच्याकडून 1,050 रुपये, चिखली हद्दीतील पंचमुखी महादेव मंदिर परिसरात प्रकाश तुकाराम कराडे (वय 57, रा. साकेगाव) याच्याकडून 605 रुपये, देऊळगाव राजा हद्दीतील देऊळगाव मही येथे शेख कदीर शेख कादर (वय 59) याच्याकडून 950 रुपये, मेहकर बसस्थानकासमोर शेख खलील शेख दगडू कुरेशी (वय 45) याच्याकडून 1,600 रुपये, धामणगाव बढे हद्दीतील रोहिणखेड येथे शिवाजी भि. इंगळे (वय 57) याच्याकडून 1,005 रुपये आणि शिवाजीनगर हद्दीतील निर्मल टर्निंग खामगाव येथे आकाश श्याम वानखडे (वय 22) याच्याकडून 5,115 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गतही दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. लोणार पोलीस स्टेशन हद्दीतील येवती येथे राजेंद्र रंगनाथ डोईफोडे (वय 60) याच्याकडून देशी दारूसह 1,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव बु. येथे समाधान पिराजी वाघुळ (वय 28, रा. चिंचोली बुरकुल) याच्याकडून 1,210 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, प्रताप बाजड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सहभागी होते. प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles