मुक्ताईनगर येथील गायकवाड इंग्लिश क्लासमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, मनोगत, कविता, नृत्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमधील आठवणींना उजाळा देत शिक्षकांनी दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करताना वातावरण क्षणभर भावनिक झाले.
यावेळी क्लासचे संचालक प्रा. सतीश गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “सन २०१० पासून सुरू असलेल्या गायकवाड इंग्लिश क्लासचा प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. इंग्लिश विषयातील ग्रामर, रायटिंग स्किल्स, वाचन कौशल्य व पाठ्यपुस्तकांचे अध्यापन शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने केले जाते. संकल्पना स्पष्ट करण्यावर विशेष भर दिला जातो.
ते पुढे म्हणाले की, नियमित सराव, वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे विद्यार्थी इंग्लिश विषयात उल्लेखनीय गुण मिळवत यश संपादन करत आहेत.
कार्यक्रमास प्रा. राजेश गायकवाड, श्री. आकाश गायकवाड, पूजा मॅडम व ज्ञानेश्वरी ताई यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सौहार्दपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या निरोप समारंभाने सर्वांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण केल्या.






