मुक्ताईनगर प्रतिनिधी…. येथील खडसे महाविद्यालयात करिअर कौन्सलिंग अँड प्लेसमेंट सेल व किरण अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “एकात्मिक प्लेसमेंट आणि इंटर्नशिप कार्यक्रम” यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमासाठी किरण अकॅडमी, पुणे येथील उपाध्यक्ष चेतनसिंग राजपुरोहित हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व इंटर्नशिपच्या संधी, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास तसेच करिअर नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व ओळखावे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. वंदना विजय चौधरी होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपयुक्त कार्यक्रमांचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरसाठी ठोस दिशा ठरवावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील 90 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन व उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सी. जे. पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार समिती समन्वयक प्रा. डॉ. अतुल वाकोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करिता प्रा. डॉ. ताहिरा मीर यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरलेला हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला
खडसे महाविद्यालयात एकात्मिक प्लेसमेंट व इंटर्नशिप कार्यक्रम संपन्न
Advertisement
Subscribe to Viral News Live






